आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे येथे घडली होती घटना‎:एसटी चालकाला मारहाण‎ प्रकरणी दोन वर्षांचा कारावास‎

अमरावती‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाची बस घेऊन जाणाऱ्या‎ एका चालकाला रस्त्यात अडवून मारहाण‎ करण्यात आली होती. ही घटना चांदूर रेल्वे‎ येथे सात वर्षांपूर्वी घडली आहे. या प्रकरणात‎ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३)‎ राजेंद्र ताम्हाणेकर यांनी आरोपीला दोन वर्षे‎ सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा‎ निर्णय न्यायालयाने मंगळवार, १४ मार्च राेजी‎ दिला आहे.‎ विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू‎ उर्फ नीलेश रमेशराव भालेराव (३२, रा.‎ महालक्ष्मी नगर, चांदूर रेल्वे) असे शिक्षा‎ झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात‎ संजू दशरथ पलेरिया (५३, रा. वर्धा) यांनी‎ तक्रार दिली होती.

१ फेब्रुवारी २०१६ रोजी संजू‎ पलेरिया हे वर्धा आगाराची बस घेऊन चांदूर‎ रेल्वे मार्गे अमरावतीला येत होते. दरम्यान‎ सकाळी साडेसहा ते सात वाजताच्या‎ सुमारास चांदूर रेल्वे येथे संजू पलेरिया यांची‎ बस थांबवून पप्पू भालेराव यांनी त्यांच्यासोबत‎ वाद घातला होता. त्यानंतर संजू पलेरिया बस‎ घेऊन अमरावतीत आले. घडलेल्या‎ वादाबाबत त्यांनी अमरावती बस स्थानक‎ परिसरातील पोलिस चौकीत माहिती दिली‎ होती. त्यानंतर तीच बस घेऊन सायंकाळी ते‎ पुन्हा वर्धा येथे जाण्यासाठी निघाले असता त्या‎ बसचा पाठलाग करून भालेरावने चांदूर रेल्वे‎ येथे ती बस पुन्हा थांबवली. त्यावेळी पलेरिया‎ यांना बसच्या खाली ओढून त्याने मारहाण‎ केली होती.

बातम्या आणखी आहेत...