आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पेढी नदीमध्ये पोहताना बुडून दोन तरुणांचा मृत्यू ; दोघेही शहरातील यास्मिननगरचे रहिवासी

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कामुंजा-वझ्झरखेड येथून पेढी नदी वाहते. याच नदीत अंघोळीसाठी गेलेल्या शहरातील यास्मिन नगरातील १८ वर्षीय दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २७ ऑगस्टला सायंकाळी घडली.मो. अरबाज मो. साबिर (१८) आणि शाहबाज शहा असद शहा (१८, दोघेही रा. यास्मिननगर, अमरावती) अशी मृतक तरुणांची नावे आहेत. मो. अरबाज, शाहबाज शहा हे दोघे त्यांच्या अन्य दोन ते तीन मित्रांसह शनिवारी दुपारी पेढी नदी भागात फिरायला गेले होते. दरम्यान वलगाव पोलिस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या कामुंजा-वझ्झरखेड भागातून वाहणाऱ्या पेढी नदीच्या पात्रात ते अंघोळीसाठी गेले. अंघोळ करत असताना कामुंजा येथील पुलालगत नदीत मोठ्या आकाराचा खड्डा आहे. नदीला पाणी भरपूर असल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. दरम्यान अंघोळ करताना अरबाज व शाहबाज नेमके या खड्ड्याच्या दिशेने गेले आणि पाण्यात बुडाले. या वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. त्यावेळी कामुंजा आणि वझ्झरखेड येथील नागरिकांनी सुद्धा घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी दोन्ही गावातील काही नागरिकांनी तत्काळ नदीत उड्या मारून दोन्ही तरुणांचा शोध घेत त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वलगावचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. या प्रकरणात वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...