आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उद्धव ठाकरे यांना खासदार-आमदार‎ राणा दाम्पत्याने धर्मविरोधी संबोधले‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने हिंदूंसाठी केलेले कार्य हे‎ जगजाहीर असताना शिवसेनाप्रमुख‎ उद्धव ठाकरे यांना राणा दाम्पत्याने‎ धर्मविरोधी संबोधले. पण या राणा‎ दाम्पत्याने मात्र हिंदू धर्मासाठी‎ कोणतेही मोठे कार्य केले नाही. ते‎ मुस्लिम मतांवर निवडून आले‎ आहेत, मात्र, आता त्यांना त्यांचा‎ हेतूपुरस्सरपणे विसर पडला आहे,‎ असा आरोप शिवसेना (उद्धव‎ ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सुनील‎ खराटे यांनी मंगळवारी येथे‎ पत्रपरिषदेत केला.‎ आधी खा. नवनीत राणा‎ स्वत:ला फायर म्हणायच्या. आता‎ हिंदू शेरनी संबोधतात. एवढेच नव्हे‎ तर आता त्या ‘जो रामका नही वो‎ हिंदू नही’ असेही उद्धव ठाकरे यांना‎ संबोधून म्हणतात. तसेच त्यांना‎ ‘भाईजान’ म्हणण्यासारखे त्यांनी‎ काय केले ते तरी राणा दाम्पत्याने‎ स्पष्ट करावे. उगाच धार्मिक तेढ‎ निर्माण करू नये. सरकारने याकडे‎ लक्ष द्यावे, अशी मागणीही खराटे‎ यांनी केली.‎ खा. राणा यांच्या जात‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रमाणपत्राच्या प्रकरणावर सुप्रीम‎ कोर्टात सुनावणी सुरू आहे, आम्ही‎ निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत, असेही‎ ते म्हणाले. या पत्रपरिषदेला सुनील‎ खराटे यांच्यासह प्रदीप बाजड, धाने‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाटील, विकास शेळके, संजय‎ गव्हाळे, नीलेश सावळे, जिल्हा‎ संघटक ज्योती अवघड, युवासेना‎ प्रमुख पंकज चौधरी व इतर‎ उपस्थित होते.‎

शिवसेनाच खासदारपदासाठी देणार उमेदवार‎ आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट)‎ खासदारपदासाठी उमेदवार देणार आहे. उमेदवाराचे नावही ठरले असून ते नाव‎ मी सांगणार नाही. याआधीही येथे ५ वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आले‎ आहेत. स्थानिक काँग्रेस नेते त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करीत असले‎ तरी वरिष्ठ स्तरावरूनच याबाबत निर्णय होणार असल्यामुळे शिवसेनेचाच‎ उमेदवार असेल, असेही खराटे म्हणाले.‎