आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेश कोल्हे खून प्रकरण:‘एनआयए’ने अमरावतीतून आणखी दोघांना केली अटक; प्रकरणातील आरोपींची संख्या झाली नऊ

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्हेटर्नरी मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या खुनप्रकरणात ‘एनआयए’च्या पथकाने बुधवारी (दि. 3) आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांमुळे प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे. दरम्यान ‘एनआयए’च्या पथकाने आज अटक केलेल्या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करुन ट्रांझिट रिमांड मागितला. यावेळी ट्रांझिट रिमांड मिळाला असून 7 ऑगस्टपूर्वी मुंबईच्या ‘एनआयए’ न्यायालयासमोर दोघांनाही हजर करावे लागणार आहे.

उमेश कोल्हे यांचा खुन केल्यानंतर मारेकरी आरोपींना आश्रय दिल्याचा ठपका एकावर आहे. याचवेळी दुसरा आरोपी हा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान याचा निकटवर्तीय असून त्याच्या वाहनाचा चालक आहे. तो अनेकदा इरफानसोबत राहत असल्याचे समोर आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. ‘एनआयए’चे पथक मंगळवारी (दि. २) शहरात आले आहे, त्यांना पुर्वी अटक केलेल्या आरोपींच्या तपासातून या दोघांचा सहभाग समोर आला होता. त्या आधारे ‘एनआयए’च्या पथकाने मंगळवारी दिवसभर या दोघांचा शोध घेवून त्यांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले, त्यांची सखोल विचारपूस करुन बुधवारी पहाटेदरम्यान अटक केली आहे. अटक केलेले आरोपींची घर झडती तसेच त्यांच्याबाबत इतर माहिती काढण्याचे काम एनआयएकडून सुरू आहे.

दरम्यान त्या दोन्ही आरोपींना अटकेनंतर 24 तासांच्या आतमध्ये न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘एनआयए’च्या पथकाने या दोघांनाही बुधवारी दुपारच्यावेळी स्थानिक प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करुन ट्रांझिट रिमांड मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळी स्थानिक न्यायालयाने ही विनंती मान्य करुन 7 ऑगस्टपूर्वी दोघांनाही मुंबईच्या ‘एनआयए’ न्यायालयात हजर करण्याबाबत परवागनी दिली आहे. अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...