आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा सवाल:दर्यापुरात महिला काँग्रेस नेत्याच्या घराचे अनधिकृत बांधकाम पाडले

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामाला राजकीय वरदहस्त असल्याने ते काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन आतापर्यंत अपयशी ठरत होते. मात्र, मुख्याधिकारीपदी नव्याने रुजू झालेले नंदू परळकर यांनी अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू केली असून, पालिका इमारतीसमोर राहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या पद्माताई भडांगे यांच्या घराचे अतिक्रमित बांधकाम पाडले.

या नेत्या स्थानिक आमदार यांच्या गोटातील समजल्या जात असून, त्यांचे यजमान गोकुल भडांगे हे सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आहे. भडांगे कुटुंबीयांनी घराचे बांधकाम करताना काही भागात अतिक्रमण केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे बुधवारी थेट जेसीबी मशीन लावून पालिकेने पाड काम केले. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मुख्याधिकारी नंदू परळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली. जेसीबीच्या मदतीने खोलीचे पक्के बांधकाम व आवार भिंत जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमण केलेल्या नागरिकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

गणेश नगर स्थित भू खंडाला लागून असलेल्या शासकीय जागेवर गेल्या १५ वर्षांपासून भडांगे कुटुंबाने पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले होते. आजपर्यंत या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासनाने डोळेझाक केली होती. परंतु नवीन मुख्याधिकारी राजू झाल्यावर त्यांनी संबंधितांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली. दरम्यान भडांगे यांनी ती नोटीस स्वीकारत कुठलाही अडथळा निर्माण न करता अतिक्रमण काढू दिले. या कारवाईनंतर पालिका बाजारपेठेतील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण केव्हा तोडणार, असा प्रश्न विचारला जात आहे. आरश्याचा बाब म्हणजे नगरपालिका क्षेत्रात अतिक्रमित जागेवर कित्येक वर्षांपासून ठिक-ठिकाणी अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी घरकुलांच्या नावावर दुकानेही बांधण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...