आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:युनियन बँकेला पडला राष्ट्रध्वजाचा विसर ; स्वातंत्र्याचा उत्सव साजरा

ढाणकी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर झेंडा या अभियानांतर्गत दि. १३ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्ट या दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरावर सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकवून आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान या अभियानांतर्गत देशातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय, अनुदानित आस्थापनेवर राष्ट्रध्वज फडकावणे अनिवार्य असताना ढाणकी येथील युनियन बँकेवर तिन्ही दिवस राष्ट्रध्वज फडकला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून बँक कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी भाजपा ढाणकी शहर अध्यक्ष रोहित वर्मा यांनी तहसीलदार यांना मागणी केली आहे.

या बाबत संतप्त झालेल्या नागरिकांनी व रोहित वर्मा यांनी बँक व्यवस्थापक यांना विचारणा केली असता, राष्ट्रध्वज फडकवणे हे बँकेला अनिवार्य नसल्याचे व ध्वजवंदन हे आमच्या झोनल शाखेत होते असे त्यांनी उद्धट भाषेत सांगितले. त्यामुळे नागरिकांचा पारा चढला व शाब्दिक वाद झाला. याबाबत आपल्याकडे कोणता असा शासकीय आदेश आहे का? अशी विचारणा रोहित वर्मा यांनी केली असता, संबंधित अधिकारी निरुत्तर झाला. अशा राष्ट्रध्वज प्रती व देशाबद्दल आदर नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी रोहित वर्मा यांनी केली आहे.

कारवाईसाठी पाठपुरावा करणार
प्रत्येक भारतीयांच्या हृदयात स्थान असलेल्या राष्ट्रध्वज प्रती बँक कर्मचाऱ्यांची उदासीनता पाहून फार वाईट वाटले. शासकीय आस्थापनेवर राष्ट्रध्वज फडकवणे अनिवार्य असताना १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान युनियन बॅंकेच्या इमारतीवर एकही दिवस ध्वज न फडकावणे ही फार मोठी घटना असून अशा बँक कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हायला हवी. याबाबत मी तहसीलदार यांना निवेदन दिले असून याचा पाठपुरावा मी करणार आहे.
रोहित वर्मा, भाजपा ढाणकी शहर अध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...