आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंचे भाकीत:2024 शिवसेनेला मोठे नुकसान होणार! वेळ गेलेली नाही, शिवसेना-भाजपची आताही युती शकते, रामदास आठवले यांचे आवाहन

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2024 मध्ये शिवसनेचे मोठे नुकसान होणार आहे, असे भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच भाजपसोबत आताही युती करावी, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. असेही आठवले म्हणाले. रामदास आठवले आज अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शिवसेनेने भाजपसोबत आताही युती करावी असं आवाहन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो असं रामदास आठवले म्हटले आहेत. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमधून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं आता महत्त्वाचे असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...