आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देऊरवाडा ग्रामपंचायतीचा अजब कारभार:नागरिकांना नियमबाह्य नोटीस; निवडणूक आयोग, विभागीय आयुक्तांकडे तक्रार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने ग्राम पातळीवर कर्तव्य निभावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकांना आपले प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आहे. मात्र, अनेकदा हे जबाबदार अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करतात. असाच प्रकार चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळाला असून ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांनी आपला पदाचा दुरुपयोग करून नागरिकांना नियमबाह्य नोटीस पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे.

पदाधिकाऱ्यांना पाठवली नोटीस

दरम्यान या प्रकरणाची निवडणूक आयोग, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, तसेच चांदूर बाजारचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. देऊरवाडा येथील संतोष घायर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांसोबत तेथे राहत असून त्यांच्याकडे कुठलीही जनावरे नाही. शेळी नसूनदेखील ग्रामपंचायतकडे कुणीतरी तक्रार दिली आणि त्या तक्रारीची शहानिशा न करता किंवा पदाधिकाऱ्यांनी सभा न घेता तत्काळ त्याच दिवशी त्यांना नोटीस पाठवली.

काय म्हणाले संतोष घायर

एरवी अनेक कामात दिरंगाई करणारी ग्रामपंचायत इतकी वेगवान कशी झाली, असा प्रश्न नागरिक विचारत असून ही नियमबाह्य आणि पदाचा दुरुपयोग करणारी कृती संबंधितांनी का केली, हे एक कोडेच आहे. दरम्यान घायर यांनी हा मुद्दा गंभीरतेने घेत ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्या विरोधात संबंधित यंत्रणांकडे तक्रार नोंदविली आहे. देऊरवाडा ग्रामपंचायत येथे महिला सरपंच आणि उपसरपंच आहे. मात्र त्यांच्या नावावर इतर दुसरेच सदस्य पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे अनेक घटना देऊरवाडा येथे घडत आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी संतोष घायर यांच्या निवेदनात उमटली आहे.

देऊरवाडा या गावातून शिरजगाव कसबा तसेच पुढे चांदूर बाजार रोड जातो. त्या सार्वजनिक रोडवर अनेक बकऱ्या, गुरे-ढोरे असतात. वाहने असतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असताना ग्रामपंचायतीने कधीच स्वतः हून पुढाकार घेऊन याबाबत नोटीस का काढली नाही असा सवालही ग्रामपंचायतीमधील विरोधक विचारत आहेत.

बातम्या आणखी आहेत...