आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सर्वाधिक जुनी शाळा म्हणून होली क्रॉस मराठी स्कुल ओळखल्या जाते. या शाळेसमोरील चिखलदरा स्टॉप ते गोपालनगर रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नेहमीच असते. शाळा सुटल्यानंतर या शाळेसमोर मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची भीती असते. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा विचार करत शाळा व्यवस्थापन व शहर वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
होलीक्रॉस मराठी शाळेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्याांना शैक्षणिक धडे दिल्या जातात. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यत शाळेचे शैक्षणिक सत्र चालते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास फारशी वाहतूक नसते. त्यामुळे कोंडी होत नाही. मात्र जेव्हा शाळेला सुटी होते, त्यावेळी प्रचंड गर्दी उसळते. विद्यार्थ्यांना घ्यायला येणारे ऑटो, कार, दुचाकीची एकच गर्दी होते. काही विद्यार्थी सायकलीने तर काही पायदळ जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना व पालकांना घरी जाण्याची घाई असते.
या घाईगडबडीत रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण होते. छोट्या मोठया घटना तर रोज या शाळेसमोर पहायला मिळतात. कधी तर गाड्या लावण्यावरुन वादंगसुद्धा होतो. भविष्यात या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. शाळेतुन विद्यार्थी सोडताना रांगेत किंवा वर्गनिहाय सोडल्यास शाळेसमोर गर्दी होणार नाही, तसेच शाळा परिसरात येणाऱ्या पालक व शालेय ॲाटो चालकांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे. याठिकाणी शाळेच्यावतीने सुरक्षा रक्षक ठेवणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.