आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:यूपीएससी परीक्षेचे विनामूल्य प्रशिक्षण; 25 पर्यंत अर्ज करा

अमरावती5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, नागरी सेवा परीक्षा-२०२३ (आयएएस, आयपीएस, आयएफएस) करत विनामूल्य पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी ‘भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र’ कार्यरत आहे.

या केंद्रात प्रवेशासाठी राज्य स्तरावरून ऑफलाइन पद्धतीने प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाइन पद्धतीने आगामी २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. प्रवेश परीक्षा ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाणार आहे. अभ्यासक्रम व ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता पकडे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...