आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू केली जप्त:पुलाच्या बांधकामात मातीमिश्रित वाळूचा वापर; वाळू केली जप्त

अंजनगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली ते काळगव्हाण मार्गावरील पुलाच्या बांधकामात मातीमिश्रित वाळूचा वापर होत असल्याची तक्रार काही सजग नागरिकांनी केली.

त्यानंतर चिंचोली रहिमापूर येथील तलाठी अनिता धांडे यांनी या वाळूचा रेतीचा पंचनामा करत ती जप्त केली. शासनाच्याच कामावर माती मिश्रीत वाळूचा वापर होत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान पुलाच्या कामात आम्ही कोणतीही माती मिश्रीत वाळू वापरू दिली नाही व यापुढेही ती वापरू दिली जाणार नाही, असे उपविभागीय अभियंता एन. जी. अघम यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...