आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणे महोत्सव:शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या बियाण्यांचा वापर करा : राज्यमंत्री बच्चू कडू

चांदूर बाजारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी उगवण क्षमतेची खात्रीशीरपणे तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उत्कृष्ठ उगवण क्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणार असून शासन खंबिररित्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

चांदुर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान, चांदूर बाजारच्या तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननिर, अचलपूरच्या तालुका कृषि अधिकारी स्नेहल ढेंबरे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उत्कृष्ठ उगवण क्षमता असलेले बियाणे घरीच तयार करुन बियाणे महोत्सवाच्या माध्यमातुन ही चळवळ राबवावी. बीज उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवणार असल्याची ग्वाही ही राज्यमंत्री कडू यांनी दिली.

तत्पूर्वी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ बियाणे विक्रीसाठी सहभागी झालेत. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही त्यांच्यासाठी घरचे उत्पादित केलेले दर्जेदार बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले. शेतकरी बांधवांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कांदा, भुईमुंग, भाजीपाला व इतर बियाणे वाजवी दरात उपलब्ध केली.

उगवण क्षमतेची चाचणी होणार : शेतकऱ्यांना आपल्या जवळील बियाणे विक्री करण्यासाठी त्यांच्या जवळील ट्रेमध्ये उगवणक्षम बियाण्यांची माहिती देण्यासाठी व तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या ट्रेमध्ये विविध पिकांच्या बियाण्यांच्या उगवणीबाबत माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

महोत्सवात अनेक स्टॉल्सचा समावेश
बीजोत्पादक कंपनी व कृषी विभागाचे स्टॉल्स आहेत. कल्चरयंत्र म्हणजेच पेरणीपूर्वी बियाण्यांवर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया यंत्राच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या प्रतवारी प्रक्रियेची यावेळी माहिती घेतली. बीजप्रक्रियेसाठी ड्रमची व्यवस्था व औषध उपलब्ध करून देण्यात आले. शेतकऱ्यांना वाजवी दरात बीजप्रक्रिया करून देण्याची सुविधा महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, जैविक बीजप्रक्रियेसाठी स्टॉल उभारण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...