आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:12  ते 18  वर्षांच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण ‘मिशन तरुणाई’ सुरू ; पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये उद्घाटन सोहळा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यामध्ये कोविड १९ लसीकरणात १२ ते १८ वर्षे वयोगटातील लसीकरणाचे काम अत्यंत कमी असून, या वयोगटातील लाभार्थी निरुत्साही दिसून येत आहे. ते बघता जिल्ह्यामध्ये ६ जून पासून मिशन तरुणाई अंतर्गत या वयोगटातील शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १२ जूनपर्यंत १२ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांचे संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पांडा यांच्या उपस्थितीत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. १६० लाभार्थ्यांचे लसीकरण केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले, डॉ. विनोद करंजीकर, डॉ. सरिता हजारे, डॉ. अंकुश मानकर व तसेच वैद्यकीय चमू उपस्थित होती. लसीकरण यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पोदार इंटरनॅशनलचे प्राचार्य सुधीर महाजन, शिक्षक व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेतले. येत्या काही काळात चौथ्या लाटेची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...