आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती शहरातील प्रसिद्ध बालाजी मंदिरात सोमवार, २ जानेवारीला वैकुंठ एकादशीनिमित्त बालाजी मंदिराचे वैकुंठद्वार उघडण्यात आले. या द्वारातून भगवान बालाजींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. वर्षातून एकदाच हे द्वार उघडले जाते. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासून भाविकांनी बालाजींचे दर्शन घेतले. वैकुंठ एकादशीनिमित्त पालखी काढण्यात आली. मंदिरावर सुरेख विद्युत रोषणाई करण्यात आली. भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.