आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Valuable, Business oriented Knowledge Should Be The Core Purpose Of Education; Former UGC President Dr. Thorat's Statement | Amravati Marathi News

अर्थशास्त्र परिषद:मूल्यात्मक, व्यवसायाभिमुख ज्ञान हाच शिक्षणाचा मूळ हेतू असावा; यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. थोरात यांचे प्रतिपादन

चांदूरबाजार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी उत्पन्न असलेल्यांना उच्चशिक्षण घेताना अडचणी येतात म्हणून देशात ही संख्या ३४ टक्के तर महाराष्ट्रात ३२ टक्के आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. थोडक्यात शिक्षणाचा मूळ उद्देश हा तरुणांना केवळ ज्ञान देणे नसून, त्यांना ज्ञान आणि कौशल्यासोबतच मूल्यात्मक, व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित ४४ व्या राष्ट्रीय वार्षिक मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या उद्घाटकीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भास्करदादा टोम्पे होते. उद्घाटन रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. आशुतोष रारावीकर, डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ. संतोष कुटे, डॉ. कैलास पाटील, डॉ. आर. वाय. माहुरे, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. राहुल मोपरे, डॉ. विजय टोम्पे, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. संजय कोठारी, डॉ. नंदकिशोर गव्हाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी डॉ. थोरात यांनी ‘महाराष्ट्रातील उच्च शिक्षणातील वर्तमानकालीन समस्या : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयाची विस्तृत मांडणी केली. ते पुढे म्हणाले भारतात धर्म, जात, उत्पन्न, महिला आणि पुरुष यात फार मोठा असमतोल आहे. त्यामुळे या सर्वांना समान पातळीवर उच्चशिक्षण कसे देता येईल, यावर विचार व्हायला हवा. उद्घाटकीय भाषणात डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, देशातील अनेक अर्थकारणीय समस्यांची उकल या परिषदेच्या माध्यमातून केली जाते. सामाजिक, आर्थिक प्रश्नाकडे नीटपणे पाहून सर्वसामान्य लोकांच्या जगण्यात अर्थ हा विषय कसा अविभाज्य भाग आहे, हे पटवून दिले. तर परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कोरोना काळात सर्वसामान्य माणसांचे झालेले बेहाल, आरोग्याच्या अपुऱ्या सोयी, औषधांचा तुटवडा, महागाई, प्राणवायूची कमतरता यामुळे डबघाईला आलेली शासन व्यवस्था याचा अतिशय अभ्यासपूर्ण लेखाजोखा मांडला.

यावेळी डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ. कैलास पाटील, डॉ. आर. वाय. माहुरे, डॉ. राहुल म्होपरे, डॉ. भांडवलकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मारुती तेगमपुरे यांनी केले. समन्वयक डॉ. संजय कोठारी यांनी तीनदिवसीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका व्यक्त केली.

प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी स्वागतपर भाषण केले.
समारोप गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला., यावेळी भास्करदादा टोम्पे यांनी विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा फार गंभीर विषय असून यावरसुद्धा सखोल संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शशिकांत दुपारे व डॉ. श्रीकृष्ण उबरहंडे यांनी केले तर आभार डॉ. पार्वती शिर्के यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, शोधनिबंध वाचक व महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्थसुमती व इतर पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
यावेळी परिषदेच्या ‘अर्थसुमती’ नावाच्या स्मरणिकेसोबतच डॉ. सुखदेव थोरात, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. दातीर आणि डॉ. गुजर यांच्या अर्थशास्त्रीय पुस्तकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच डॉ. ज. फा. पाटील यांच्या पुस्तकाला परिषदेकडून पारितोषिकही देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...