आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया ग्रुपवर महिनाभरापूर्वी एक मेसेज पडला. सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे ऑपरेशन करायचे आहे. त्यामुळे आर्थिक मदत करा. मात्र, अलीकडे अशा पद्धतीने सोशल मीडियावर फेक पोस्ट सुद्धा येत असतात. त्यामुळे माहिती खरी किंवा खोटी याबाबत पडताळणी करण्यात आली. खरोखरच चिमुकल्याला मदतीची गरज असल्याचे समोर आले आणि शहरातील वंदे मातरम ग्रुपच्या सदस्यांनी अवघ्या दोन दिवसांत चिमुकल्याच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली रक्कम जमा केली. नुकतेच चिमुकल्याचे ऑपरेशन झाले आणि वंदे मातरमच्या पुढाकराने चिमुकल्याच्या वेदना कमी झाल्या, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना चिमुकल्यांच्या आई - वडिलांचे डोळे पाणावले होते.
राजवीर संजय अनासने असे शस्त्रक्रिया झालेल्या सात महिन्यांच्या चिमुकल्याचे नाव आहे. जन्मत:च राजवीरच्या गुदद्वारामध्ये अडचण होती. त्यामुळे जन्माच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर अडीच महिन्याचा असताना दुसरी शस्त्रक्रिया झाली. संजय अनासने अकोटचे असून, त्यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्यामधून त्यांनी राजीवचे दोन ऑपरेशन केले. त्यावेळी शासकीय योजनेचा लाभ सुद्धा मिळाला होता. मात्र, राजवीर सहा महिन्याचा असतानाच डॉक्टरांनी तिसरी शस्त्रक्रिया करण्याबाबत सांगितले. मात्र, आता शासकीय योजनेचा लाभ घेता येत नव्हता. ऑपरेशनला सुमारे एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. नातेवाइक व गावाकडील मित्रमंडळींनी त्यांना मदत केली मात्र ती अल्प होती. त्यामुळेच राजवीरची आई कोमल यांनी एक मेसेज सोशल मीडियावर टाकला. हा मेसेज शहरातील वंदे मातरम ग्रुपपर्यंत पोहोचला.
सुरूवातीला वंदे मातरमच्या सदस्यांनी खरंच राजीवला गरज आहे का, याबाबत माहिती घेतली. त्याला गरज असल्याचे लक्षात येताच ग्रुपवर मदतीचा मेसेज टाकण्यात आला आणि अवघ्या दोन दिवसांत राजवीरच्या ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या रकमेची तरतूद झाली. मात्र, डॉक्टरांनी एक महिन्याची ट्रिटमेंट करुन ऑपरेशनची सल्ला दिला. एक महिन्यानंतर १ ऑगस्टला राजवीरची शहरात शस्त्रक्रिया पार पडली. त्यासाठी लागणारा जवळपास ८० हजारांचा खर्च ‘वंदे मातरम’कडून करण्यात आला.
केवळ मदतच नव्हे तर नातेवाइकांप्रमाणे काळजी घेतात
राजवीरला घेऊन त्याचे आई व वडील मागील आठ दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात आहे. यावेळी केवळ आर्थिक मदत देवून वंदे मात्रेचे सदस्य थांबले नाहीत तर ग्रुपच्या ज्या सदस्याला शक्य आहे, तो रुग्णालयात जाऊन राजवीर व त्याच्या आईवडीलांची विचारपूस करुन काळीजसुद्धा घेतात.
शब्दांपलीकडची मदत
आमच्या बाळासाठी ‘वंदे मातरम्’ ने वेळीच केलेली मदत शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे. सहा महिन्यातच तिसऱ्यांदा ऑपरेशन करावे लागणार असल्यामुळे चिंता होती, मात्र वंदे मातरमच्या रुपाने आर्थिक व मायेचे बळ मिळाले.
कोमल अनासाने, राजवीरची आई.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.