आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:‘व्हीसीए’ची आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आजपासून

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्हीसीएद्वारे १५ वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला बुधवार, दि. २१ डिसेंबरपासून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात होत आहे. पहिली लढत अमरावती विरुद्ध बुलडाणा अशी खेळली जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ‘व्हीसीए’ जिल्हा समितीचे चेअरमन शरद पाध्ये, व्हीसीए सह-सचिव चंद्रकांत माणके, जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देेशपांडे सचिव डाॅ. दिनानाथ नवाथे यांच्या उपस्थितीत होणार आहे. नुकतीच या स्पर्धेसाठी शालेय क्रिकेट संघाची निवड चाचणी घेण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...