आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांचे दर गगनाला भिडले:गणेश, महालक्ष्मी उत्सवामुळे भाजीपाला ; फळ-फुलबाजारात तेजी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरवाशीण ज्येेष्ठा-कनिष्ठांचे शनिवारी (दि. ३) आगमन झाले. रविवारी (दि. ४) त्यांचे पूजन आहे. त्यानिमत्त त्यांना सुग्रास भोजनाचा नैवद्य दाखवण्यात येणार आहे. मात्र, गौरी, गणपती उत्सवामुळे भाजीपाला, फळ, फुलांच्या बाजारात लाखोंची उलाढाल होत आहे. पुजेसाठी फळे, फुले, तर कोहळ्याला मागणी वाढली आहे. ठाेक बाजारात फुलांचे दर गगनाला भिडले आहेत.

जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ, भाजीपाला व फुलाना फटका बसला. मात्र, गौरी गणपतीमुळे पुन्हा त्यांचे दर तेजीत आले आहेत. ठोक बाजारात झेंडूची फुले १०० ते २०० रुपये, शेवंती २५० ते ५०० रुपये, गुलाब ३०० ते ५०० रुपये, निशिगंध २५० ते ६०० रुपये प्रति किलो, महालक्ष्मी पुजेसाठी तयार हार ६०० ते २५०० रुपये जोडी, तर जरबेरा व गुलाबाचे गुच्छ १५० ते ४०० दराने विकल्या गेलेत. फळबाजारात सर्वाधिक आवक जालना येथील मोसंबी व चंदिगड, शिमला, दिल्ली येथून आलेल्या सफरचंदांची झाली असून पुजेसाठी सफरचंद, मोसंबी, डाळींब व मक्याच्या कणसाला मागणी असल्याने त्यांचे दर वधारले असल्याचे फळ व्यावसायिक मोहम्मद आरीफ मन्सुरी यांनी सांगीतले. भाजीबाजारदेखील गरमच होता. गौरी पूजनासाठी कोहळ्याच्या भाजीचा मान असताना मात्र शनिवारी बाजारा समितीत त्याची आवक केवळ २० क्विंटलच झाली.

१६ प्रकारच्या भाज्यांसह चटण्यांचा पूजेत मान
महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये कथली, आंबिलसह १६ प्रकारच्या भाज्या आणि चटण्यांचा मान आहे. या सोळा भाज्याही बाजारात आल्या आहेत. त्यांचे महत्त्व पाहता त्यांच्या किंमतीही भडकल्या आहेत. महालक्ष्मीचे जेवण केळीच्या पानावर वाढले जाते, तर पूजेसाठी केळीच्या खांबांचे महत्त्व असून केळीचे पान १० रुपयाला एक, तर पाच खांबांची जोडी ५० ते ७० रुपयांपर्यंत उपलब्ध होती. आघाडा, केणा, दुर्वा, बेल, सोनपान यांचे तयार पुडेही ४० ते ५० रुपयांच्या
घरात होते.

३०० ते ३५० क्विंटल कोहळ्याची आवश्यकता
महालक्ष्मी पूजनानिमित्त आज घरोघरी जेवण असते. राशीवर ठेवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये कोहळ्याचा मान असतो, तर भाजी करण्यासाठीही कोहळ्याला प्राधान्य दिले जाते. अनेकजण दोन ते तीन दिवसांपूर्वीच कोहळ्याची खरेदी करतात, तर काही जण आदल्या दिवशी व जेवणाच्या दिवशी खरेदी करता. शनिवारी कृउबासमध्ये कोहळ्याची केवळ २० क्विंटल आवक झाली. मात्र शहरात जवळपास ३०० ते ३५० क्विंटल कोहळ्याची आवश्यकता असल्याची माहिती भाजीपाला व्यावसायिक विष्णू बनकर यांनी दिली.

फुलांना मागणी वाढल्याने भाव तेजीत
सध्या गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. या वर्षी पाऊस जास्त झाल्याने आवक कमी आणि मागणी जास्त आहे. त्यामुळे भाव वाढले आहे. आज महालक्ष्मी पूजनासाठी फुलांची मागणी जास्त असते. त्यामुळे अंदाजे शहरात १ हजार मे. टन फुलांची ठोक व चिल्लर बाजारात विक्री होते.
गोविंद बाखडे, फुल व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...