आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांत संताप:दर्यापुरात संतप्त गोप्रेमींनी पेटवले जनावरांची वाहतूक करणारे वाहन; वाहतुक करणार्यांवर गुन्हा दाखल

दर्यापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोघांवर केलेली कारवाई ताजी असतानाच शहरात शनिवारी (दि. १८) जनावरांची अवैध वाहतूक करताना महिलेला धडक देऊन पळ काढणाऱ्या वाहनाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान त्यापैकी एका वाहनाला लागल लागली. ही आग तांत्रिकदृष्ट्या लागलेली नसून लावण्यात आली असल्याची चर्चा दिवसभर शहरात होती.

पोलिसांनी सुटका केलेल्या सर्व जनावरांची रवानगी शहरातील गोरक्षणात करण्यात आली. त्यापैकी एका जनावराचा मृत्यू झाला. दरम्यान साडेदहाच्या सुमारास संतप्त गोप्रेमींनी एमएच २०/ ईएल ५५३ क्रमाकांचे वाहन रेल्वे क्रॉसिंग चौकात पेटवले. मात्र ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागल्याचे पोलिसांनी सांगीतले. १८ जनावरांसह दोन मालवाहू वाहने असा एकूण एकूण १७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सायंकाळी उशीरापर्यंत दर्यापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुन्हा दाखल; तपास सुरू गोरक्षणातून दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणत असतांना रेल्वे क्रॉसिंग चौकात एका मालवाहू वाहनाने तांत्रिक बिघाडामुळे पेट घेतला. घटनेतील दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पळून गेलेल्या वाहन चालकांवर प्राणी सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमी महिलेच्या तक्रारीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येईल. - प्रमेश अत्राम, ठाणेदार, दर्यापूर

बातम्या आणखी आहेत...