आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेती उत्खनन:कोटी ८० लाखांच्या साहित्यासह वाहने जप्त, अवैधरीत्या रेती उत्खनन; १७ जणांविरुद्ध गुन्हा

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरोरा तालुक्यात सोईट घाटाचा शासनाने लिलाव केला. फक्त दिवसच रेती काढण्यास व वाहतूक करण्यास परवानगी असताना, अवैधरीत्या पोकलेन मशीनने उत्खनन करून रात्री रेतीची तस्करी केली जात होती. उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष्य नोपानी यांनी धाड टाकत वाहनासह दोन कोटी ८० लाखांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरोरा तालुक्यातील सोईट येथील वर्धा नदीपात्रातील रेती घाटाचा शासनाने लिलाव केला. लिलावात अधिकृत व्यक्तीने रेती घाट घेतला. रितसर परवाना घेऊन रेती घाट व वाहतूक सुरू होती. घाटात कोणतीही यंत्रसामग्री वापरता येत नाही. तसेच ट्रॅक्टर वगळता कोणतेही मोठे वाहन नेता येत नाही. रेती ट्रॅक्टरमध्ये मजुरांकडून भरावी व सूर्यास्तापर्यंतच काम करावे, असा नियम आहे. मात्र नियम डावलून रात्री मशीनद्वारे रेतीचे उत्खनन करून त्याद्वारे रेती भरली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष्य नोपानी यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी धाड टाकली. यामध्ये सहा हायवा ट्रक, दोन टिप्पर, दोन पोकलेन मशीन, १८ ब्रास रेती असा दोन काेटी ८० लाख रुपयांचा ऐवज जप्त करत १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ही कारवाई आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार, दीपक दुधे, दिलीप सूर, मनोहर आमने, मोहन निषाद, सूरज मेश्राम, दिनेश मेश्राम, दीपक मेश्राम व विठ्ठल काकडे यांनी केली. एसडीपीओंनी धाड टाकून जप्त केलेले अवैध रेतीचे ट्रक.

बातम्या आणखी आहेत...