आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेंटिलेटर:डफरीनच्या एसएनसीयू तील व्हेंटिलेटरचा वापर अजूनही बंद

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील नवजात शिशूंसाठी असलेल्या अतिदक्षता विभागातील (एसएनसीयू) व्हेंटिलेटर बंद आहेत. दोन महिन्यांपूर्वी या विभागातील एका व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यापासून व्हेंटिलेटरचा वापर थांबवण्यात आला. तसेच या विभागात पुन्हा नव्याने सर्व वायरिंगचे काम सुरूच आहे. सर्व काम अंतिम टप्प्यात आले असून, आठवड्याभरात व्हेंटिलेटर सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिली.

डफरीन येथील एसएनसीयू विभागात २५ सप्टेंबरला एका व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. यावेळी या वॉर्डमध्ये एकूण ३७ नवजात शिशूंवर उपचार सुरू होते. यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिका व डॉक्टरांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. त्यानंतर मागील दोन महिन्यापासून एसएनसीयू विभागात व्हेंटिलेटरचा वापरच बंद आहे. त्यामुळे कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या गंभीर नवजात शिशूंना इतर रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे, तर सध्या एसएनसीयू विभागात २० नवजात शिशूंनाच ठेवण्यात येत आहे. या विभागात स्फोटामुळे जळलेली सर्व वायरिंग बदलण्याचे कामही आता अंतिम टप्प्यात आले.

बातम्या आणखी आहेत...