आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफल:श्री अंबादेवी संगीत सेवा समारोहात २६ पासून दिग्गजांची रंगणार मैफल

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दशकांची परंपरा लाभलेल्या श्री अंबादेवी संगीत सेवा महोत्सवात २६ ते २७ या दोन दिवसांच्या कालावधीत देशातील दिग्गज शास्त्रीय गायक, वादकांच्या मैफलीचा नि:शुल्क आनंद कला रसिकांना मिळणार आहे. श्री अंबादेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात कौशिकी चक्रवर्ती, पं.बुधादित्य मुखर्जी, पं.वेंकटेश कुमार हे संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणार आहेत.

शनिवार २६ रोजी सायंकाळी ७ वाजता शास्त्रीय संगीत गायिका कौशिकी यांची मैफल रंगणार असून, खयाल आणि ठुमरी या गायन प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. मूळ कोलकाता येथील असल्या तरी त्यांनी कर्नाटकी संगीताचे धडे गुरू बाल मुरली कृष्ण यांच्याकडून घेतले असून, शास्त्रीय संगीत गायक पद्मभूषण अजोय चक्रवर्ती व चंदना चक्रवर्ती यांच्या काैशिकी या कन्या आहेत. त्यांनी देशातील प्रतिभावान गायिकांचा शक्ती हा संगीत उपासना गट तयार केला असून, या संगीत गटाद्वारे देशातील नामांकीत पौराणिक व ऐतिहासिक शक्तीरूप महिलांची जसे देवी दुर्गा, देवी सरस्वती, देवी गंगा, देवी लक्ष्मी, पांडव माता कुंती, देवी सीता, देवी राधा, द्रौपदी, मीरा यांची संगीताच्या माध्यमातून आराधना केली जाते. विशेष बाब अशी की, या शक्ती गटातील सर्व वाद्य वादक या महिलाच आहेत. राग भैरवीतील उर्वरित. पान ४त्यांचे भजनंही चांगलेच गाजले आहेत.

रविवार २७ रोजी सकाळी १० वाजेपासून पं. बुधादित्य मुखर्जी यांचे सितार वादन होणार आहे. इमदादखानी घराण्याचे ते कलावंत असून, वेगाने सितार वादन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सुरबहार मास्टर अशीही त्यांची ख्याती आहे. ते पहिले असे कलावंत आहेत, ज्यांना लंडनच्या हाऊस आॅफ काॅमन्समध्ये कला सादर करण्याची संधी मिळाली. महान वीणा वादक बालाचंदर यांनी त्यांचा शतकातील सितार वादक असा गौरव केला आहे. १९७० पासून आजतागायत त्यांनी देश-विदेशात हजारो कार्यक्रम सादर केले आहेत. भारत सरकारने या महान कलावंताला पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे.

मध्यंतरी दोन वर्षे कोरोनामुळे संगीत सेवा समारोहाचे आयोजन करण्यात आले नव्हते. परंतु, तरीही दोन दशके सातत्याने हा समारोह होत असल्याची माहिती श्री अंबादेवी संस्थानाचे विश्वस्त डाॅ. जयंत पांढरीकर यांनी दिली.

पं.व्यंकटेश कुमार सादर करतील बंदिश
पं. व्यंकटेश कुमार हे किराणा व ग्वाल्हेर अशा दोन्ही संगीत घराण्याशी संबंधित असून, ते शास्त्रीय गायनात दोन्ही घराण्याच्या बंदीश अमरावतीकर कला रसिकांपुढे २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून सादर करतील. स्वामी हरिदास यांच्यावरील त्यांची शास्त्रीय संगितातील भजनंही फारच लोकप्रिय आहेत. त्यांच्या गायकीवर बडे गुलाम अली खान आणि कर्नाटकी शैलीतील गायकांचा प्रभाव जाणवतो. पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवात १९९३ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी पं.भीमसेन जोशी यांच्या आमंत्रणावरून त्यांनी कारकीर्दीत प्रथम कार्यक्रम सादर केला. त्यानंतर त्यांनी देश-विदेशात शेकडो कार्यक्रम सादर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...