आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार नवनीत राणांचा 'लुंगी डांस'वर ठेका:अमरावतीमधल्या नवरात्रोत्सवात लावली हजेरी; बिनधास्त अंदाजाचा धमाल VIDEO

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदा 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर गरबा खेळण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवात सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळीसुद्धा रमलेले दिसत आहेत. यात आता दांडिया खेळण्याचा मोह खुद्द खासदार नवनीत राणा यांनी देखील आवरता आला नाही.

यंदा गणेश उत्सवानंतर आता नवरात्री उत्सव देखील मोठया प्रमाणात साजरा केला जात आहे. गरबा आणि दांडिया खेळत आपण नवरात्रीचे नऊ दिवस साजरा करत असतो. या सर्व जल्लोषाच्या वातावरणात गरबा-दांडियाची मजा तर काहीतरी वेगळीच असते. यामध्ये कोरोना काळात 2 वर्षे दांडिया खेळण्यास ब्रेक लावण्यात आला होता. यावर्षी मात्र कुठलेही बंधने नसल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे.

हिंदी-गुजराती गाणे

भाजपच्या खासदार नवनीत राणा देखील गरब्याचा आनंद घेताना दिसून आल्या. अमरावती शहरात यंदा मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी हजेरी लावली. यावेळी राणा यांनी तरुणांसोबत गरबा खेळला. दांडिया स्पेशल हिंदी आणि गुजराती गाण्यांच्या चालीवर नवनीत यांनी ठेका धरला.

दांडियाची परंपरा

रंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात. या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे संबोधिले जाते. स्त्री आणि पुरुष गोलाकार फेर स्वरूपात हे नृत्य करतात. रंगीबरंगी पोशाख, दागिने घालत महिला या नृत्यात सहभागी होतात तर पुरुषही पारंपरिक वेशभूषा करतात.

या नृत्यप्रकाराची समाजात लोकप्रियता आहे. आणि युवापिढीत या नृत्याचे आकर्षण आहे. शारदीय नवरात्र काळात विविध संस्था किंवा संयोजन संस्था मोकळ्या पटांगणावर दांडिया नृत्याचे व्यावसायिक स्वरूपात आयोजन करतात.

बातम्या आणखी आहेत...