आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:विदर्भात चोवीस तासांत झाला 113 कोरोना रुग्णांचा मृत्यू; बुधवारी आढळले तब्बल 10,415 नवे रुग्ण

अमरावती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद स्वॅबचे गौडबंगाल : बाटल्यांवर चुकीच्या नोंदी

विदर्भात कोरोनामुळे बुधवारी ११३ जणांचा मृत्यू झाला, तर १०४१५ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील ९१ जणांमध्ये नागपूरच्या ६६ तसेच भंडारा ९, चंद्रपूर ५ गडचिरोली ३, वर्धा ६, तर गोंदिया जिल्ह्यातील २ जणांचा समावेश अाहे. पश्चिम विदर्भात कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला असून यात यवतमाळ ८, बुलडाणा २, अकाेला ८, तर अमरावती जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश अाहे.

नागपूर विभागात साेमवारी ८५६३, तर अमरावती विभागात १८५२ नवे रुग्ण आढळले. विदर्भातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ३४ हजार ६७६ वर पोहोचली, तर मृतांची एकूण संख्या ९४९१ झाली. आतापर्यंत ४ लाख ४८ हजार ५६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर बुधवारी ७१२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

रेमडेसिविर नागपुरात मेडिकल, फार्मसी स्टोअरमध्ये विकण्यास बंदी
नागपुरात रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकल आणि फार्मसी स्टोअरमध्ये विकण्यास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बंदी घातली आहे. राज्याच्या अनेक भागात इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यामुळे काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. इंजेक्शनचा अनियंत्रित वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी ठाकरे यांनी हा आदेश काढला.

औरंगाबाद स्वॅबचे गौडबंगाल : बाटल्यांवर चुकीच्या नोंदी
अाैरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना काही कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे संसर्गवाढीचा धाेका निर्माण हाेत अाहे. याचे उदाहरण म्हणजे शहर व जिल्ह्यातील राेज सरासरी ३० संशयित रुग्णांचे काेराेना चाचणी अहवालच गहाळ हाेत अाहेत. संबंधिताने स्वॅब दिल्यानंतर काही कर्मचारी त्या बॉटलवर (व्हीटीएम) रुग्णाच्या नोंदी व्यवस्थित करत नाहीत. परिणामी प्रयाेगशाळेत या स्वॅबची तपासणी हाेत नाही व संबंधितांना त्याचा अहवालही मिळत नाही. दुसरीकडे रिपाेर्ट नाही म्हणजे आपण निगेटिव्ह आहोत, असे समजून अनेक बाधित बिनधास्त फिरतात आणि स्वत:साेबत इतरांचेही अाराेग्य धाेक्यात अाणत अाहेत. यापैकी काही रुग्ण ज्येष्ठ नागरिक अाहेत, रिपाेर्ट येईपर्यंत त्यांना उपचारही मिळत नाहीत. प्रयाेगशाळांमधून वारंवार याबाबत अाराेग्य विभागाला माहिती दिली जाते, मात्र अजूनही त्यात सुधारणा झालेली दिसत नाही.

मराठवाड्यात ६ हजार १७२ काेराेना पॉझिटिव्ह, ९१ मृत्यू
मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी या विभागात ६१७२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एकूण ९१ जणांना मृत्यू झाला. ४४६७ जणांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून ४८ हजार ६८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी औरंगाबादमध्ये १४०७, जालना ६१४, परभणी ६८४, हिंगोली १९५, नांदेड १२५५, लातूर ९६९, उस्मानाबाद ४६८, बीडमध्ये ५८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर औरंगाबादेत २९, नांदेड २६, परभणी १२, बीड १०, जालना ६, उस्मानाबाद ५, लातूर २ व हिंगोलीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...