आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांदूर रेल्वे श्री संत बेंडोजी बाबा संजीवन यात्रा महोत्सवानिमित्त अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने घुईखेड केसरी महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेचे घुईखेड येथे मंगळवारी (दि. ३१) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धकाला चारी मुंड्या चित करत वाशीम येथील विजय शिंदे घुईखेड केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. ७५ ते १२५ किलो वजन गटात विजय शिंदेने अमरावतीचा पहिलवान विकी उईके याला १२-२ गणांनी ६ मिनीटात पराभूत करीत घुईखेड केसरी होण्याचा मान पटकावला. द्वितीय पुरस्काराचा मानकरी जळगावचा बाबू ढगे ठरला. ३८ ते ४५ किलो गटातील प्रथम पारितोषिक अनिल दळवे व द्वितीय पारितोषिक विजय चतुर यांनी पटाकवले. ४५ ते ५० किलो गटातील प्रथम बक्षीस अर्जुन यादव व द्वितीय बक्षीस करण यादव यांनी मिळवले.
५० ते ६० किलो गटात विकी खैरे व विकी उईके हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरले. ६० ते ६५ किलो गटातील प्रथम पारितोषिक अनुज साखरा व द्वितीय बक्षीस सचिन तोडकर यांनी, तर ६५ ते ७० किलो गटातील प्रथम बक्षीस गोविंद कपाटे व द्वितीय बक्षीस अभिषेक मल्लेकर यांनी पटकावले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप इंगोले, माजी महापौर विलास कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष संजय तिरथकर, प्रवीण घुईखेडकर, रोशन बोडके, अशोक देशमुख, रमेश काकडे, नंदू काकडे, अरविंद चनेकार, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख अरुण पडोळे, प्रवीण विधाते, सलीम बेग, युसुफ खान, बाळासाहेब सोरगीकर, गुड्डू शिंगारे, शेख रफिक शेख गफुर यांच्या उपस्थितीत पार पडला. पंच कमिटीचे प्रमुख राहुल, जितेंद्र भुयार, अजिंक्य मुळे, रोहित बोकडे, बाबू धुर्वे, अजय पंखमोडे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेला किशोर मेहर, बबलू घुईखेडकर, मुकूंद काकडे, कैलास सावंतकर, जनार्दन शेंडे, विनय गोटेफोडे, सुनील चणेकर, मधुकर हरडे, सुनील इंगोले, लखपती मेश्राम, मनोहर कोल्हे, हरिचंद्र वरघट, डॉ. ज्ञानेश्वर वानखडे, सुनील इंगोले, शेख रफिक शेख कपूर, दीपक जयस्वाल, बाळू बंड आदींसह क्रीडाप्रेमीं, नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.