आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकपूर्ती:‘ व्हीएमव्हीचा’ शताब्दी महोत्सव; ‎उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महोत्सवाचा प्रारंभ‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री, उपमंत्री, खासदार, आमदारापासून ते ‎ ‎ न्यायमूर्तीं यापैकी कोणतेही एक पद घ्या. विदर्भ ‎ ‎ महाविद्यालयातून शिक्षण हा त्यातील समान दुवा‎ आहे. त्यामुळेच अमरावतीकरांना अत्यंत दिमाखात‎ या पहिल्या शासकीय महाविद्यालयाचा इतिहास‎ सांगता येतो. किंबहूना व्हीएमव्हीची ही सुसंगती‎ त्यांना कायम बिलगली आहे. या सर्व आठवणींना ‎ ‎ उजाळा देण्यासाठीच उद्या, सोमवार, १० एप्रिलला ‎ ‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या‎ संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ होत आहे.‎

माजी राज्यपाल रा.सु. गवई, विधान परिषदेचे‎ माजी उपसभापती प्रा. शरद तसरे, राज्याच्या ‎ ‎ विधीमंडळातील मुलूख मैदानी तोफ प्रा. बी.टी. ‎ ‎ देशमुख, विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे, क्रीडा‎ मंत्री राहिलेले डॉ. अनिल वऱ्हाडे, महाराष्ट्र-मध्यप्रदे‎ श एकसंघ असतानाचे माजी मुख्यमंत्री बी.ए.‎ देशमुख, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता‎ व अॅड. यशवंतराव शेरेकर, माजी आमदार बबनराव‎ मेटकर, अमरावतीचे प्रथम महापौर डॉ. देवीसिंह‎ शेखावत ही सर्व मंडळी त्याकाळी विदर्भ‎ महाविद्यालयात (आताची शासकीय विदर्भ ज्ञान‎ विज्ञान संस्था) शिकत होती. एवढेच नव्हे तर‎ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य माजी कुलगुरु‎ डॉ. के.जी. देशमुख, न्यायमूर्ती जी. जी. भोजराज,‎ पंकृविचे माजी कुलगुरु एल. एन. बोंगीरवार, माजी‎ पोलिस महासंचालक सूर्यकांत जोग, जिल्हा व सत्र‎ ‎ ‎न्यायाधीश डब्ल्यू. के. अलमेलकर, आर. एन.‎ बोंगीरवार, नागपुरचे निवृत्त जिल्हाधिकारी एम. एस.‎ देशमुख अशा दिग्गज मंडळींनीदेखील याच‎ महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर नोकरीत‎ आपला ठसा उमटवला आहे.‎

संस्थेच्या मूळ निर्मितीत ज्यांनी फार मोठा‎ हातभार लावला, शिवाय संस्थेला अनेकदा भेटी‎ देऊन तिच्या कार्याला प्रोत्साहन दिले, असे‎ अनेक दानशूर त्या काळात या शहरात होऊन‎ गेले. त्यात दादासाहेब खापर्डे, रावबहादूर डॉ.भट यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.‎ महाविद्यालयाच्या त्या काळातील स्थानिक‎ हितचिंतकांची परंपरा फार मोठी असून त्यात सर‎ मोरोपंत जोशी आणि दि. ब. ब्रम्ह यांच्याखेरीज,‎ रा. मो. खरे, बाबासाहेब खापर्डे, वीर वामनराव‎ जोशी, न्यायमूर्ती मंगलमूर्ती, वाय जी. देशपांडे,‎ डॉ. शिवाजीराव पटवर्धन, ना. रा. बामणगावकर,‎ रावबहादूर रणदिवे, बॅ. रामराव देशमुख, डॉ.‎ पंजाबराव देशमुख, बॅरिस्टर चौबळ, रावबहादूर‎ द. वा. शिदोरे आदींचा समावेश आहे.‎

…पण ते स्वप्नपूर्ती बघायला‎ हयात नव्हते‎ ‎ २८ जुलै १९२३ ला विदर्भ महाविद्यालयाची‎ स्थापना झाली. त्यावेळी या शैक्षणिक दालनाचे‎ नाव किंग एडवर्ड कॉलेज असे होते.‎ उद्घाटनाला प्रांताचे तत्कालीन शिक्षण मंत्री‎ रावबहादूर नारायणराव केळकर उपस्थित होते.‎ परंतु आद्य प्रवर्तक रावबहादूर मुधोळकर हे मात्र‎ आपल्या मनातील स्वप्न पूर्ण झालेले पाहावयास‎ हयात नव्हते. स्थापनेच्या दोनच दिवस अगोदर ते‎ दिवंगत झाले होते. सर मोरोपंत जोशी व‎ दिवाणबहादूर केशवराव ब्रम्ह यांचे‎ योगदानदेखील या महाविद्यालयाच्या स्थापनेत‎ फार मोठे होते. या दोघांनी सरकार दरबारी आपले‎ वजन कुशलतेने खर्च करुन या संस्थेचा पाया‎ मजबूत केला आहे.‎