आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित शहरातील श्री. आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर नाशिरपूर येथे नुकतेच पार पडले. शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, श्रमदान, बौद्धिक सत्र, समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवत गावातील नागरिकांमध्ये जनजागृती केली.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद नरहरीपंत गावंडे व दिनेश अर्डक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीश कांबळे, तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिकपूरचे सरपंच तुषार गावंडे, नीलेश गुडधे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अश्विन लुंगे यांनी केले.
सूत्रसंचालन रा. से. यो. प्रतिनिधी अभिजित चौधरी व श्वेता दरवाई यांनी केले. आभार प्रदर्शनाची धुरा साक्षी दवणे यांनी सांभाळली. कार्यक्रमाला रा. से. यो. महिला कार्यक्रम कार्यक्रम अधिकारी डॉ. शीतल पारे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश उल्हे, प्रा. विजया चव्हाण, प्रा. गजानन हरडे, प्रा. डॉ. रवि धांडे, प्रा. डॉ. रविकांत महिंदकर, जगदीश सुर्वे, सुबोध जाधव, योगेश कासे व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेकरिता सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतलेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.