आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गाडगेबाबा विद्यापीठाची सिनेट निवडणूक:उर्वरित जागांसाठी 20 ला मतदान, तर 22 नोव्हेंबर रोजी मतमोजणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीसभा (सिनेट), विद्वत परिषद (अ‍ॅकडेमीक कौन्सिल) व अभ्यासमंडळ प्रतिनिधींसाठी आगामी 20 नोव्हेंबरला निवडणूक होत असून 22 ला मतमोजणीचा अंतीम निकाल घोषित केला जाईल.

दरम्यान माघारीअंती या निवडणुकीचे चित्र काहीसे स्पष्ट झाले असून सिनेटच्या दोन तर विद्वत परिषदेची एक जागा बिनविरोध निवडली गेली आहे. विजयी झालेल्या तीनपैकी दोन उमेदवार हे ‘नुटा’ संघटनेचे असून संस्थाचालकांच्या मतदारसंघातून विजयी झालेले विजय मोघे हे नुटा समर्थित उमेदवार असल्याचा त्या संघटनेचा दावा आहे.

विद्यापीठ सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार संस्थाचालकांच्या सहा प्रतिनिधींच्या मतदारसंघातून श्री. विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेचे (दिग्रस) पदाधिकारी विजय मोघे व विद्यापीठातील त्री सदस्यीय शिक्षक मतदारसंघातून रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. मनीषा कोडापे बिनविरोध विजयी झाल्या. याशिवाय उमेदवार न मिळाल्याने प्राचार्य संवर्गातील अनुसूचित जमातीची एक जागा कायम रिक्त राहणार आहे. त्यामुळे सिनेटच्या 39 ऐवजी 36 सदस्यांसाठीच प्रत्यक्ष निवडणूक घेतली जात आहे.

त्याचवेळी विद्वत परिषदेमध्ये फॅकल्टी ऑफ इंटर-डिसीप्लीनरी स्टडीजच्या महिला मतदारसंघातून युवाशक्ती शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रा. सविता केने ह्या बिनविरोध विजयी झाल्या. पात्र उमेदवारच नसल्यामुळे सिनेटप्रमाणे विद्वत परिषदेतही एक जागा कायम रिक्त राहणार असून प्रा. केने यांच्या बिनविरोध निवडीमुळे येथेही विद्यापीठाला आठऐवजी सहाच जागांसाठी निवडणूक घ्यावी लागत आहे. दरम्यान डॉ. मनीषा कोडापे व प्रा. सविता केने ह्या नुटाच्या अधिकृत उमेदवार असून विजय मोघे हे नुटा समर्थित उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवित होते.

प्रत्येक अभ्यासमंडळावर तीन-तीन सदस्य निवडून पाठवावयाचे होते. दरम्यान 45 पैकी 29 अभ्यासमंडळांसाठी प्रत्येकी तीनच अर्ज प्राप्त झाल्याने संबंधित उमेदवारांना बिनविरोध प्रतिनिधित्व मिळाले आहे. यामध्ये फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या प्राणीशास्त्र, बायोकेमीस्ट्री, सांख्यिकी, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य अभियांत्रिकी, मेकॅनिकल इंजीनिअरिंग, प्रॉडक्शन इंजीनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान, कम्प्यूटर सायन्स अँड इंजीनिअरिंग, ह्युमॅनिटीज अँड अप्लाइड सायन्सेस जनरल इंजीनिअरिंग, इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंग, टेक्सटाइल टेक्नॉलॉजी व केमीकल अँड पॉलीमर टेक्नॉलॉजी, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या बिझनेस एकॉनॉमिक्स व कॉमर्स, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजच्या हिंदी, उर्दू, संस्कृत, पाली-प्राकृत-बुद्धीजम, पर्शियन, म्युझिक, सोशिऑलॉजी, फिलासॉपी व भूगोल तसेच फॅकल्टी ऑफ इंटर डिसीप्लीनरी स्टडीजच्या शिक्षण, शारीरिक शिक्षण, होम सायन्स आणि सोशल वर्क या अभ्यासमंडळांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...