आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस आयुक्त कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी रविवारी (दि. १३) मतदान होणार आहे. पोलिस मुख्यालय परिसरातील पोलिस पब्लिक स्कूलमध्ये मतदान व मत मोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाच्या निवडणूकीत तब्बल चार पॅनल निवडणूक रिंगणात आहे. पोलिस आयुक्तालयात कार्यरत अंमलदारांपैकी १ हजार २९५ सभासद या निवडणुकीत मतदान करु शकणार आहेत. मागील काही वर्षानंतर पतसंस्थेसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकाचवेळी चार पॅनल निवडणूक मैदानात आल्यामुळे चुरस वाढली आहे. सकाळी ८ वाजेपासून सुरू होणारे मतदार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होऊन रात्री आठ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.
यावेळी १२ सदस्य निवडून येणार आहे. पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष पोलिस आयुक्त असतात. त्यामुळे निवडून येणाऱ्या सदस्यांमधून उपाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, रात्री आठ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमिला भिवगडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.