आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान:24 ग्रामपंचायतीसाठी 72 केंद्रावर 22 हजार 792 मतदार बजावणार हक्क

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एकूण 74 ग्रामपंचायतीपैकी मुदत सपंलेल्या 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावल्यानंतर रविवारी (दि. 18) सकाळी तालुक्यातील 72 मतदान केंद्रावर 22 हजार 792 मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करणार आहे.

यामध्ये 18 हजार 818 पुरुष, तर 10 हजार 973 महिला मतदार व एक तृतीयपंथ आहे. या निवडणूकीत २४ सरपंच पदासाठी 92, तर 119 सदस्य पदांसाठी एकूण 266 उमेदवार रिंगणात आहेत. महसूल व इतर प्रशासकीय यंत्रणाही मतदानासाठी सज्ज झाली आहे.

शनिवारी (दि. 17) सकाळपासूनच तहसील कार्यालयातून एकूण 72 इव्हीएम मशीन व मतदान प्रक्रीयेसाठी लागणारे आवश्यक साहित्य मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात नेण्यास प्रारंभ झाल्याचे चित्र होते. निवडणूक होत असलेल्या २४ ग्रामपंचायती व मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार असून या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येकी एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई आणि एक पोलिस कर्मचारी असे एकूण 432 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

सरपंच पदासाठी थेट जनतेतून मतदान होत आहे. काही गावांमध्ये दोन ते तीन पॅनल आमने-सामने असल्याने या गावातील निवडणूक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. मतदारांनी निवडणूक आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, निवडणूक नायब तहसीलदार अनिल नाडेकर व अव्वल कारकून वर्षा नवलार यांनी केले आहे.

मतदानासाठी नागरिकांनी घ्यावा पुढाकार

दर्यापूर तहसीलदार डॉ. योगेश देशमुख म्हणाले की,​ दर्यापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना निर्भय व खुल्या वातावरणात मतदान करता यावे यासाठी महसूल व पोलिस प्रशासन पूर्ण दक्ष आहे. 100 टक्के मतदान व्हावे यासाठी स्वयं स्फुर्तीने नागरिकांनी पुढाकार घ्यावा. ठिकठिकणच्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकेही तयार करण्यात आली आहे.

महसूल प्रशासनाने दिली माहिती

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 72 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रीयेतील कर्मचारी, ईव्हीएम मशीन व निवडणुकीचे साहित्य शनिवारी घेवून जाणे व रविवारी परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या 5 बसेस, 8 खाजगी बसेस व 4 शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोस्टल बॅलेट मतदानासठी 31 अर्ज आले असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.

बातम्या आणखी आहेत...