आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आनंदवाडी परिसरालगत सातरगाव सारशी मार्गावरील जंगलाला दुपारी पावणे चारच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली होती. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र तोपर्यंत हजारो हेक्टरवरील वनसंपदा जळून राख झाली.
अज्ञात माथेफिरूने ही आग लावली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अग्नितांडवाने आनंदवाडी परिसरात भीती निर्माण झाली होती. कारण लोकवस्तीत ही आग शिरण्याची शक्यता होती. नागरिकांनीही मिळेल त्या साधनाने आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला होता. घटनास्थळी तिवसा पोलिस, महसूल विभाग, नगरपंचायत प्रशासनाने धाव घेतली. आग विझल्यानंतर अग्निशमन दलाचे एक वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले होते. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.