आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न पाण्याचा:पिण्याच्या पाण्यासाठी आदर्श ग्राम वनोजा ग्रामस्थांची भटंकती; नागरिकांना करावा लागत आहे अनेक अडचणींचा सामना

वनोजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून गावात सतत पाणी टंचाई निर्माण होत आहे. गावातील महिलांना उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणी टंचाईचेही चटके सहन करावे लागते. नळाद्वारे पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना दिवसभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

एकेकाळी वनोजा गाव ‘आदर्श गाव’ म्हणून तालुक्यासह जिल्ह्यात नावाजले होते. आज रोजी वनोजा ग्रामपंचायतीकडे पिण्याच्या पाण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. उन्हाळ्याची चाहूल लागताच गावात पाण्याची मागणी वाढते. पाणी टंचाईमुळे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे. येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बहुंताश वेळी ग्रामपंचायतमध्ये उपस्थित नसतात. तसेच त्यांना पाण्याबद्दल माहिती विचारली असता ते ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली अडचण सांगायची तरी कोणाला? असा प्रश्न उपस्थित होतो.

यापूर्वी गावकऱ्यांसाठी येथील पाझर तलावातील विहिरीतून पाणी पुरवठा सुरू होता. मात्र, आता त्या विहिरीतील जलसाठा संपला. तसेच वनोजा गावकऱ्यांसाठी सोनल प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र समृद्धीच्या कामामुळे पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नादुरुस्त आहे. त्यामुळे वनोजा गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष असून सोमवारी जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

ग्रा.पं.ला सोयरसुतक नाही
गावात अशी पाणी टंचाईची कधीच आली नव्हती. वापरण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे ते कोणत्याच कामाचे नसते. पण नाईलाजाने ते वापरावे लागते. ग्रामपंचायतकडून नियोजन नाही. याबाबत ग्रामविकास अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात.
विकी चौधरी, ग्रामस्थ वनोजा

दुरुस्तीचे काम संथगतीने
समृद्धीच्या कामामुळे येडशी फाटा ते भुरफाट्यापर्यंत पाइपलाइन नादुरुस्त झाली आहे. दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असून संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...