आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:21 वर्षीय तरुणीच्या संपर्कातील आईसह दोन बहिणींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, जिल्ह्यात रुग्णांची संख्या नऊ 

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात दहा रुग्ण आढळून आले असून, यामध्ये एक मृतक व नऊ रुग्णांवर उपचार सुरु

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील २१ वर्षीय तरुणी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली असता, ती कोराना बाधित असल्याने तिच्या परिवारातील आई व दोन बहिणींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

धामणगाव येथील २१ वर्षीय तरुणीला ताप खोकला असल्याने, तीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतला होता.दिनांक १६ मे रोजी प्रकृती चिंताजनक असल्यामुळे ति सावंगी मेघे रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती.तिचा स्त्राव तपासणी करिता पाठविल्याने ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. तिच्या निकट संपर्कातील असलेल्यांचे स्त्राव तपासणी करिता पाठविले असता,त्या आई वय ४५ ,बहीण २६ व २४ वर्षीय राहणार धामणगाव या तीन महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याने, त्या चार महिलांवर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दहा रुग्ण आढळून आले असून, यामध्ये एक मृतक व नऊ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असल्यामुळे सर्व बाजारपेठ सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये धास्ती बसली असल्याचे चित्र जिल्ह्यातील बाजारपेठत दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...