आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ:अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणात राणाविरोधात वॉरंट जाहीर, खार येथील घरी पोहचले पोलिस

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. अमरावतीेचे मनपा आयुक्तांवरील शाई फेक प्रकरणात हे वॉरंट काढण्यात आले आहे. पोलिस ते घेऊन त्यांच्या खारमधील घरी देखील दाखल झाले मात्र राणा घरी नसल्याने वॉरंट कोणी घेतले नाही. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी त्यांना हे वॉरंट आल्याने राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावतीतल्या एका चौकात महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बेकायदेशील असल्याचे सांगत पालिकेने हा पुतळा रातोरात हटवला. त्यानंतर राणा दाम्पत्य हे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती. तेव्हापासून अमरावतीचे मनपा आयुक्त आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू झाला. आणि त्याच वेळी त्यांच्यावर मनपा आयुक्तावर शाई फक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय म्हणाले रवी राणा ?

अमरावती सीपींनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रकरणामध्ये वॉरंट काढले. हे केवळ मी विधान परिषद निवडणुकीत भाजपला मतदान करू नये म्हणून महाविकास आघाडीकडून दबावतंत्र सुरू असल्याचा आरोप रवी राणांनी केला आहे. अमरावती आणि मुुंबई पोलिस खारच्या घरी आले. मला अटक करण्याचा त्यांचा हेतू होता.

केवळ मी भाजपला मतदान करू नये यासाठी मविआ सरकारकडून हे सर्व सूरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...