आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम जाहीर:वाशीम ; पदवीधर मतदारसंघ‎ निवडणूक; 15,044 मतदार‎

वाशीम23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ अमरावती पदवीधर मतदारसंघ‎ सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम‎ भारत निवडणूक आयोगाने जाहीर‎ केला आहे. निवडणुक आयोगाने‎ या मतदारसंघाचा निवडणूक‎ कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या‎ निवडणुकीचा निकाल जाहिर‎ होईपर्यंत आदर्श आचारसंहिता‎ लागू राहणार आहे. आदर्श‎ आचारसंहितेचे सर्वांनी पालन‎ करावे, असे आवाहन उपजिल्हा‎ निवडणूक अधिकारी संदिप‎ महाजन यांनी केले आहे. तर या‎ निवडणुकीत जिल्ह्यातील १५,०४४‎ पदवीधर मतदानाचा हक्क‎ बजावणार आहेत.‎ जिल्हाधिकारी कार्यालयातील‎ वाकाटक सभागृहात बुधवार, ४‎ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत ते‎ बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ३०‎ जानेवारीला अमरावती पदवीधर‎ मतदारसंघासाठी मतदान आणि २‎ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार‎ आहे. निवडणूक आयोगाच्या‎ आदेशानुसार ५ जानेवारी रोजी‎ निवडणुकीची अधिसूचना होईल.‎ १२ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे‎ सादर करता येतील. १३ जानेवारी‎ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी‎ करण्यात येईल.‎

१६ जानेवारीपर्यंत उमेदवारी‎ अर्ज मागे घेणे, ३० जानेवारी रोजी‎ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत‎ मतदान घेण्यात येणार आहे. तर २‎ फेब्रुवारी रोजी मतमोजणी‎ करण्यात येणार आहे. यासाठी‎ नोडल अधिकारी अपर‎ जिल्हाधिकारी शहाजी पवार हे‎ असतील. या निवडणुकीत‎ जिल्हयातील एकूण १५ हजार ४४‎ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क‎ बजावणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...