आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या निकाला वाशिमची बाजी:अमरावती विभागातून वाशिम पहिल्या क्रमांकावर; यंदाही मुलींचीच सरशी

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. या निकालानुसार अमरावती विभाग राज्यात सातवा, तर विदर्भात दुसर्‍या स्थानावर आहे. विभागाचा निकाल 96.81 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 3.17 टक्क्याने घसरला आहे. वाशिम जिल्हा 97.62 टक्के निकालासह विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदाही जास्तच आहे.

विभागाचा निकाल

अमरावती विभागीय मंडळाच्या अध्यक्ष नीलिमा टाके व सचिव उल्हास नरड यांनी विभागातल्या पाचही जिल्ह्याच्या निकालाचा तपशील प्रसार माध्यमांसमोर जाहीर केला. मार्च 2022 परीक्षेसाठी अमरावती विभागातून 1 लाख 55 हजार 494 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी 1 लाख 50 हजार 549 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 79 हजार 351 मुले व 71 हजार 198 मुली आहे. अनुक्रमे त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.92 व 97.984 टक्के आहे.

वाशिमने मारली बाजी

वाशिम जिल्ह्याचा निकाल 97.62 टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून 18 हजार 979 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी 18 हजार 528 उत्तीर्ण झाले. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 97.16 टक्के लागला आहे. या जिल्ह्यातील 37 हजार 885 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते. त्यापैकी 36 हजार 811 उत्तीर्ण झाले. अकोला जिल्ह्याचा निकाल 97.04 टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून 24 हजार 970 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी 24 हजार 232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अमरावती जिल्ह्याचा निकाल 96.39 टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून 38 हजार 424 विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी 37 हजार 40 उत्तीर्ण झाले. यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 96.31 टक्के लागला आहे. या जिल्ह्यातून 35 हजार 236 विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी 33 हजार 938 उत्तीर्ण झाले. कोरोनामुळे गतवर्षी मुल्यमापन पद्धतीने निकाल तयार करण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे निकालात थोडी घरसरण झाली असल्याचे सचिव नरड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...