आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न पेटला:पाण्याचा प्रश्न पेटला, दर्यापुरातील ‘मजीप्रा’च्या कार्यालयात तोडफोड ; नागरिकांचा रोष तीव्र झाला

दर्यापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक दिवसांपासून दर्यापूर शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी नागरिकांनी जीवन प्राधिकरणाला निवेदने देत विनंती केली. मात्र, मजीप्राने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष न दिल्याने सोमवारी दुपारी १ वाजता जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात संतप्त नागरिकांनी प्रचंड तोडफोड केली. या वेळी कार्यालयीन अधिकारी कोणीही उपस्थित नसल्याने नागरिकांचा हा रोष तीव्र झाला होता. दर्यापूर तालुक्यातील सांगळूद, घोडचंदी, रामगड, येवदा, वडनेर गांगाई या गावातील काही नागरिक मजीप्रा कार्यालयात पाणी प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी आले. मात्र कार्यालयात केवळ संगणकावर काम करणारे दोन कर्मचारी उपस्थित हाेते. निवेदन देणाऱ्यांपैकी काहींनी अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवल्याचे लक्षात आल्याने नागरिक संतप्त झाले. यातील काही युवकांनी मजीप्रा कार्यालयातील टेबल-खुर्ची दूरध्वनी संच आदींची तोडफोड करत नासधूस केली. माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.

यासंबधी चौकशी करणार ^अतिशय महत्त्वाच्या बैठकी बाहेर गावी आहे. मजीप्रा कार्यालयात तोडफोड झाल्याची मला माहिती कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दिली. नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणताही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने यासंबधी चौकशी करण्यात येईल. - विजय शेंडे, उपविभागीय अभियंता, मजीप्रा, दर्यापूर. अधिकारी लक्ष देत नाहीत ^अनेक दिवसांपासून दर्यापूर तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर बनला. अधिकारी लक्ष देत नाहीत. केवळ ठेकेदारांच्या विश्वासावर मनमानी कारभार सुरू आहे. निवेदन देण्यास मजीप्रा कार्यालयात गेलो असता कार्यालयातील वस्तू इतरत्र पडलेल्या दिसल्या. आमच्या आधी काही नागरिकांनी नासधूस केली असावी. - डॉ. अभय गावंडे, राकाँ., दर्यापूर.

बातम्या आणखी आहेत...