आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:जिल्हा कचेरीत पाण्याची नासाडी; गळतीकडे दुर्लक्ष

अमरावती2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कचेरीतील अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीला गळती लागल्याने नियोजन भवनच्या डाव्या बाजूला गुरुवारी दुपारी पाण्याचा अपव्यय सुरु होता. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. परंतु दुरुस्तीकार्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात असल्याने उशीरा सायंकाळपर्यंतही जलवाहिनीची गळती बंद करण्यात आली नव्हती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेगवेगळ्या भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी सदर कार्यालयाची अंतर्गत जलवाहिनी आहे. या जलवाहिनीचे जाळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती व देखभालही त्याच विभागाकडे येते, असे सांगत सदर दुरुस्तीची जबाबदारी आमची नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्पष्ट केले.

ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरुन जिल्हा कचेरीचे ‘नाझर’ यांनी या भागाची पाहणी केली. त्यांनी लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरुन सूचना देत दुरुस्ती कार्य सुरु करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. परंतु तोपर्यंत बरेच पाणी रस्त्यावर येऊन साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे तेथे उभी करण्यात आलेली वाहनेदेखील अचडणीत आली होती. प्रत्यक्षदर्शीनुसार उशीरा सायंकाळपर्यंत जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...