आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्न सुटला:काळामाथा तांड्यावरील पाणीप्रश्न  लागला मार्गी, पाइपलाइनला मंजूरी; अनेक दिवसांपासून पाणी प्रश्नासाठी ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी

सिंधीकाळेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील काळामाथा तांडा ग्रामपंचायत नेर या ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न अनेक दिवसांपासुन गाजत होता. यासाठी नागरिकांनी मनसेच्या माध्यमातून आंदोलनही उभारले. ग्रामस्थांच्या मागणीवर प्रशासनाने लक्ष दिले असून या ठिकाणी तत्पुरता पाणीपुरवठा होण्यासाठी विहीर अधिगृहन करण्यात आली आहे. तर पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पाइपलाइनच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. यामुळे काळामाथा तांड्यावरील पाणी प्रश्न कायमचा सुटल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

जालना तालूक्यातील काळामाथा तांडा ग्राम पंचायत नेर येथे तीव्र पाणीटंचाई निर्मान झाली होती. त्यामुळे ग्रामस्थाना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. परतु प्रशासनाने लक्ष देत नसल्याने मनसेच्या वतीने गावात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे पाणी व अन्नत्याग उपोषण केरून प्रषासनाचे लक्ष वेधले होते. मनसेचे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठोड यांनी उपोषणाचे हत्यार उपसतात जिल्हा प्रशासनाने तात्काळ पाणी टंचाई आणि पाणी टंचाई अंतर्गत काळामाथा तांडा येथे विहिर अधिग्रहन करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या विहरीपासून गावापर्यत नवीन पाइपलाइनच्या कामाला मंजुरी दिली.

या कामाचे सोमवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी मोजपुरी स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विलास मोरे यांची उपस्थिती होती. काळामाथा तांडा येथे गेल्या अनेक वर्षापासुन उन्हाळ्यात तिव्र पाणीटंचाई निर्मान होते. प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सूद्धा काहीच उपयोग होत नसल्याने मनसेच्या वतीने अन्न, पाणी त्याग उपोषण करण्यात आले. याची दखल प्रशासनाने घेत या ठीकाणी नळ योजना मंजुरी दिली.

या वेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन गिते, मोजपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे, मनसे जालना तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे, कोल्हे, ग्रामविकास अधिकारी नेर, सरपंच कांताबाई पाईकराव, उपसरपंच तेजस कुळवंत, कृष्णा पिसोरे, राम कातकडे , भाऊ कर्हाळे, ऋषीकेश कावळे, विलास घाटे, ओमकार गवळी, विलास बापु उफाड, मधुकर कुरेवाड, निवास पवार, संतोष पवार, गोविंद पवार, मधुकर पवार, किशोर पवार, लक्ष्मण पवार, सुदाम राठोड, राजेश राठोड, धोडिभाऊ पवार, श्रीराम राठोड, बाबुराव चव्हाण, रामराव पवार, संतोष राठोड, भरत राठोड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. पाणीप्रश्न सुटल्याने ग्रामस्थांसाठी ही बाब आनंदाची ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...