आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला. त्यानुसार १२ कोटी ४३ लाख ८२ हजार रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. यामध्ये जिल्ह्यातील ६१८ गावांत विविध प्रकारच्या ८०० उपाययोजनांचा समावेश आहे. संभाव्य टँकरची संख्या १९ इतकी प्रस्तावित आहे.
विशेष म्हणजे, गतवर्षी २७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा मात्र टँकरची संख्या ८ ने घटली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाला दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. यासाठी जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखडा तयार केला जातो. यावर्षी सीईओच्या मार्गदर्शनाखाली १२ कोटी ४३ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केलेला आहे. अन्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजूर केलेला आहे. या आराखड्यानुसार जिल्हाभरातील ६१८ गावात संभाव्य विविध प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून टँकरने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीटंचाई निर्माण होऊ नये याकडे लक्ष
पाणीटंचाई आराखडा मंजूर झाला आहे. त्यानुसार उपाययोजना करणे सुरू झाल्या आहेत. विहीर अधिग्रहित करणे मोहीम हाती घेतली आहे. संभाव्य पाणीटंचाई बघता विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. -संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता. जि.प.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.