आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प:रब्बी हंगामाकरता जिल्ह्यात मोठ्या, मध्यम प्रकल्पातून सोडणार पाणी

गिरीश पळसोदकर | खामगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, ३७ लघु प्रकल्पातून रब्बीच्या सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह इतर प्रकल्पातून जवळपास ५० हजार हेक्टर शेतीला रब्बीच्या पिकासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. ही व्यवस्था जरी पाटबंधारे विभागाने केली असली तरी या सिंचन व्यवस्थेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मान्यता अजून मिळाली नाही सध्यातरी ५० हजार हेक्टरचे नियोजन असल्याची महिती आहे.

रब्बी पिकाची पेरणीला सुरूवात केली आहे. ज्या शेतकरी वर्गाने पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे कार्यालयाकडे अर्ज केले आहे. त्यांना पाणी देण्यात आहे, यंदा पाऊस धो-धो बरसल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच वरील सातही प्रकल्प शंभर टक्के भरले होते.सात प्रकल्पातून ५ हजार ५५३ हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे.

खामगाव व जळगाव जामोद तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. याचा फायदा घेत अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. गेरुमाटरगाव येथील ज्ञानगंगा धरणातून बेलुरा, पिंपळगावराजा, जळका भडंग, राहुड, घाणेगाव, वडती वसाडी धानोरा, प्रिंप्रीदेशमुख, पारखेड, कुऱ्हा वाकूड या परीसरातील ३ हजार ३९३ हेक्टर या भागातील जमीनीला पाणी मिळणार आहे. याच बरोबर या धरणातून खामगाव, नांदुरा व खामगावच्या औद्योगिक वसाहतीला पाणी देण्यात येणार आहे.

ढोरपगाव लघु प्रकल्पातून वडजी, ढोरपगांव, काळेगांव,पोरज परिसरातील २०० हेक्टर जमीनीला पाणी देण्यात येणार आहे. तर मस मध्यम प्रकल्पातून काळेगाव, बाभुळखेड, अंबिकापूर, कोलोरी,चित्तोड़ा हिंगणा,वरखेड, हिंगणा उमरा परिसरातील १००० हेक्टर जमीनीला तर पेडका, पातोडा, रामनगर, विहिगाव,अटाळी व नागापूर या गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. राजुरा लघु प्रकल्पातून रसुलपुर, आसलगाव, वाडी यासह परिसरातील ३०० हेक्टर जमिनीला पाणी देण्यात येणार आहे. गोडाडा प्रकल्पातून काहुपट्टा, सुलज सह परिसरातील २०० हेक्टर जमिनीला पाणी देण्यात येणार आहे.

धानोरा प्रकल्पातून धानोरासह परिसरातील १२५ हेक्टर जमीनीला पाणी देण्यात येणार आहे. ढोरपगाव प्रकल्पातून ढोरपगाव भालेगावसह परिसरातील २०० हेक्टर जमिनीला पाणी देण्यात येणार आहे. लांजुड प्रकल्पातून चिखली, लांजुड, पारखेडसह ६० हेक्टर जमिनीला पाणी देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवस-रात्र एक करीत रब्बीचे उत्पादन घेण्यात घेता येणार आहे.

मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पाचा उपलब्ध साठा
मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पात ६०.३२ %, पलढग ७.५१ %, देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा ९३.४० %, मेहकर तालुक्यातील पेनटाकळी ५९.९७% या मोठे प्रकल्पात तर मध्यम प्रकल्पात खामगाव तालुक्यात ज्ञानगंगा ३३.५४ %, मस १५.०४ %, मेहकर तालुक्यातील कोराडी १५.१२ % , कोराडी को.प.बं., ४.७२%, मोताळा तालुक्यातील खामगाव तालुक्यातील मन ३६.८३ %, तोरणा ७.८९, मेहकर तालुक्यातील उतावळी प्रकल्पात १९.७९ % उपलब्ध साठा आहे.

बातम्या आणखी आहेत...