आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणी:अमरावतीच्या चांदसुरा धरणावरून 11, तर टाकळी धरणावरून होणार 5 गावांना पाणी पुरवठा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल, हर घर जल या जलजीवन मिशन अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 16 गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत चांदसुरा धरणावरून 11, तर टाकळी धरणावरून 5 गावांना पाणी पुरवठा होणार आहे. 31 कोटी 41 लक्ष रुपयांचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते पार पडला.

तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावांना पाणीटंचाईची भीषण समस्या व क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकंमध्ये वाढत असलेले विविध आजारांचे प्रमाण लक्षात घेता आमदार प्रताप अडसड यांनी पाठपुरावा करून जलजीवन मिशन अंतर्गत चांदसुरा धरणावरून 11 गावांना व टाकळी येथील धरणावरून 5 गावांना फिल्टरच्या माध्यमातून शुद्धीकरण झालेले पाणी घराघरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्या करिता 16 गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून चांदसुरा, जनुना, जावरा, जसापूर, भगुरा, सार्शी, धानोरा फशी, घारफळ, ढवळसरी, मोरगाव, लोणी, टाकळी बू., फुलआमला, दहीगाव, हिवरा बू., बोपी या गावांकरिता 31 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते पार पडला. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना या योजनेमुळे दिलास मिळाला असून त्यांनी याबाबत आमदारांचे आभार मानले.

भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र मुंदे, तालुकाध्यक्ष दीपक तिखिले, रावसाहेब रोठे, माजी नगराध्यक्ष संजय पोफळे, अनिता तिखिले, माजी नगरसेवक अरुण लाहबर, भाजयुमो तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, मनोहर नरखेडकर, सरपंच जगदीश नरखेडकर, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.