आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान ‘अपडेट:सोशल मीडियाद्वारे 40 हजार शेतकऱ्यांना हवामानाचे ‘अपडेट’ ; दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेती उत्पादनात घट होते. त्यामुळे बदलत्या हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळेच दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे जिल्ह्यातील तब्बल ४० हजार शेतकऱ्यांना हवामानाची माहिती सोशल मीडियावरील वेगवेगळ्या १२२ ग्रुपच्या माध्यमातून एकाचवेळी दिली जाते. दर मंगळवारी व शुक्रवारी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते.

भारतीय हवामान विभाग, नवी दिल्ली व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘ग्रामीण कृषी मौसम’ सेवा योजनेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूर्गापूर (बडनेरा ) येथून हवामान घटकांची दैनंदिन माहिती संकलित केली जाते. त्यानंतर भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर मार्फत देण्यात येणाऱ्या हवामान अंदाजांच्या आधारे दर मंगळवारी व शुक्रवारी कृषी विज्ञान केंद्र, दूर्गापूर (बडनेरा) येथील सर्व कृषी विषय विशेषज्त्ज्ञ, जिल्ह्यातील कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने कृषीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. हा उपक्रम केव्हीके दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. पी. सिंग, हवामान कृषितज्ज्ञ डॉ. सचिन मुंडे, हवामान निरीक्षक डॉ. व्ही. बी. पोहरे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...