आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती लॉकडाऊन:मंगळवारपासून अमरावती शहर व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात आठवडाभराचा लॉकडाऊन; मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवसभरामध्ये 727 रुग्णसंख्येचा नकोसा विक्रम; 7 बाधितांचा मृत्यू

गेल्या आठवडाभरापासून अगदी सुसाट धावणारा कोरोना थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी अमरावतीत पुन्हा 727 ही विक्रमी संख्या बाहेर आली आहे. या नव्या संख्येमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 28 हजार 815 झाली आहे. यानंतर आता राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, लॉकडाऊन 22 फेब्रुवारीच्या संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहरासाठी घोषित करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, 'सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील. स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज आहे. अंतर ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे. यामध्ये जर कुणी आंदोलन करण्याचे किंवा राजकीय काही करायचे ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल', असे त्या म्हणाल्या.

दिवसभरामध्ये 727 रुग्णसंख्येचा नकोसा विक्रम; 7 बाधितांचा मृत्यू

गेल्या आठवडाभरापासून अगदी सुसाट धावणारा कोरोना थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी पुन्हा 727 ही विक्रमी संख्या बाहेर आली आहे. या नव्या संख्येमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 28 हजार 815 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात सात जणांचा मृत्यू ओढवला. दुसरीकडे रुग्णसंख्या जास्त असलेल्या परिसरांची चाचपणी सुरू झाली असून उद्या त्या भागात कन्टोन्मेंट झोनही तयार केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...