आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिलांची कबड्डी स्पर्धा:अमरावती विद्यापीठ संघाचा गुजरातच्या चारुतर विद्यापीठ संघावर 52 गुणांनी विजय

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेच्या तिस­ऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात आठ संघांमध्ये बाद फेरीत चुरशीच्या लढती झाल्या. यातून शुक्रवार ११ रोजी अंतिम चार मानांकित संघांची निवड केली जाणार असून ते अ. भा. आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधीत्व करतील.

विद्यापीठाच्या क्रीडांगणात मॅटवर गुरुवार १० रोजी झालेल्या सामन्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाने चारुतर विद्यामंडळ विद्यापीठ (गुजरात) संघावर ५२ गुणांनी विजय मिळविला. अमरावती विद्यापीठाने ६९ विरुद्ध १७ गुणांनी हा सामना जिंकला.

पी.डी.यु.एस. सिकर विद्यापीठाने गुजरात विद्यापीठ संघावर २ गुणांनी निसटता विजय मिळविला. महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ संघावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यीपीठाने ४ गुणांनी विजय मिळविला. कोल्हापूर विद्यापीठाने छत्तरपूर विद्यापीठ संघावर २६ गुणांनी दणदणीत विजय संपादन केला.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात अजमेर विद्यापीठाने इंदूर विद्यापीठ संघाचा ४६ गुणांनी पराभव केला. अन्य एका अटीतटीच्या लढतीत अमरावती विद्यापीठ संघाने अमरकंटक विद्यापीठ संघाचा तब्बल ७२ गुणांनी पराभव केला. छत्तरपूर विद्यापीठ संघाने ग्वाल्हेर संघावर ९ गुणांनी विजय मिळविला. अहमदाबाद विद्यापीठ संघाने भोपाळ विद्यापीठ संघावर १५ गुणांनी विजय मिळविला. गांधीनगर विद्यापीठ संघाचा गुजरात विद्यापीठ संघाने २२ गुणांनी पराभव केला. कोल्हापूर विद्यापीठ संघाने जयपूर विद्यापीठ संघाचा ४ गुणांनी पराभव केला. नांदेड विद्यापीठ संघाने उज्जैन विद्यापीठावर १२ गुणांनी मात केली. सिकर विद्यापीठाने वडोदरा विद्यापीठाचा २५ गुणांनी पाडाव केला.

उद्या स्पर्धेचा समारोप

उद्या शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी दु. ४.३० वाजता अंतिम चार मानांकित संघांची निवड झाल्यानंतर लगेच स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...