आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवली मुलीची हौस:मुलगा नाही म्हणून काय झालं, लेकीची घोड्यावरुन काढली लग्नाची वरात! ; अमरावती शहरात ऑटोचालक बापाने पुरवली एकुलत्या एक मुलीची हौस

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह समारंभात शक्यतो नवरदेवाचा साज चढवलेल्या मुलाची घोड्यावरून वरात काढली जाते. पण ही परंपरा मोडीत काढून अमरावतीतील एका दाम्पत्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिची घोड्यावरून वरात काढली.

अमरावतीच्या राजा पेठ परिसरातील भेरडे भवन नजिकच्या आनंदराव भालेराव व संगीता भालेराव या दाम्पत्याने आपल्या लाडक्या लेकीची घोड्यावरून वरात काढली. मुलगी हीच आपला मुलगा असे आधीपासून त्यांच्या घरात बिंबवण्यात आले होते. त्यामुळे सृष्टीनेही अत्यंत आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारला आणि घोड्यावर बसून ती आपल्या आई-वडिलांच्या आनंदोत्सवाचा एक भाग बनली. सृष्टीचा विवाह १० मे रोजी वैभव गावंडे यांच्यासोबत पार पडला.

घोड्यावरून वधूची वरात या वैशिष्ट्यामुळे हे लग्न शेजाऱ्यांचे तर आकर्षण ठरलेच, जमलेल्या पाहुणे मंडळीसाठीही तो एक न विसरण्याजोगा ठेवा झाला. बँडबाजा आणि डीजेच्या तालावर सृष्टीची वरात दणक्यात निघाली. आनंद भालेराव हे ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा किंवा मुलगी असा भेद न बाळगता दोघांबाबतही समान दृष्टीकोन बाळगण्याच्या कृतीचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...