आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुणी येथील महिलेची पोलिसांत तक्रार‎:तर वीजपुरवठा तोडू म्हणत‎ 4.82 लाखांनी गंडवले‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची‎ बतावणी करून धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुणी येथील‎ एका महिलेची तब्बल ४ लाख ८२ हजार ६४८ हजार रुपयांनी‎ ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना नुकतीच समोर‎ आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी उशिरा रात्री‎ गुन्हा दाखल केला.‎ दुणी येथील ६२ वर्षीय महिला सेवानिवृत्त असून तिचे‎ धारणीच्या एसबीआय बँकेत खाते आहे. या खात्यात पाच‎ लाखांहून अधिक रक्कम जमा होती. दरम्यान, ३ फेब्रुवारीला‎ दुपारी एका अज्ञात व्यक्तीने निवृत्त महिलेला कॉल केला. आपण‎ पुणे येथील एमएसईबीमधून बोलत असून, तुमचे वीज बिल‎ थकीत आहे, हे बिल भरले नाही, तर वीज पुरवठा खंडित केला‎ जाईल, असे सांगून तत्काळ ऑनलाइन बिल भरण्यास सांगितले.‎

मात्र ऑनलाइन पैसे मला भरता येत नसल्याचे महिलेने‎ महावितरण अधिकारी समजून त्या सायबर गुन्हेगाराला‎ सांगितले. त्यावर त्याने मोबाइलवर एक अॅप डाऊनलोड‎ करण्यास सांगितले तसेच ते अॅप कोणते याची मसेजद्वारे माहिती‎ पाठवली. त्यानंतर त्याच्या सांगण्यानुसार महिलेने ते ॲप‎ डाऊनलोड करताना बँक खात्याची माहिती दिली. त्यानंतर काही‎ वेळात त्या महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ८२ हजार‎ ६४८ रुपये परस्पर वळती झाले. खात्यातून रक्कम कमी झाल्याचे‎ लक्षात येताच त्यांनी धारणी पोलिसांत तक्रार दिली.‎

बातम्या आणखी आहेत...