आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 प्रवाशी सुखरुप:दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी कोसळली नाल्यात

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडाऱ्यावरुन परतवाडा जाणारी एसटी बस शनिवारी (दि १९) दुपारी शहरालगतच्या रहाटगाव रिंगरोडने जात असताना एका नाल्यात कोसळली. एसटी बससमोर अचाकन दुचाकीस्वार आला, त्याला वाचविण्याच्या नादात बसचालकाचे नियंत्रण सुटले व बस सुमारे दहा ते बारा फूट खोल नाल्यालगत जावून कोसळली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही.

भंडारा आगाराची बस (क्रमांक एम. ४० वाय ५२०९) प्रवाशांना घेऊन अमरावतीमार्गे परतवाडा जात होती. नागपूर महामार्गावरून परतवाड्याच्या दिशेने जाण्यासाठी ही बस रहाटगाव रिंगरोडने जात होती. महामार्गापासून सुमारे दोन किलोमीटर समोर आल्यानंतर एसटीसमोर अचानक एक दुचाकी आली. या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस थेट दहा ते बारा फूट खोल रस्त्याच्या खाली कोसळली.

सुदैवाने या अपघात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिस व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहीती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच एसटी विभागाचे अधिकारीसुद्धा पोहोचले. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी बस उपलब्ध करुन दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, तो कोणत्या रुग्णालयात आहे, याबाबत पोलिस माहीती घेत आहे. सायंकाळी अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...