आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जणांना अटक:‘बोलत का नाही?’ म्हणत तरुणीचा गळा घोटला; मृतदेह विहिरीत टाकला

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलदऱ्यापासून ८० किमी. अंतरावर असलेल्या गावातील एक १९ वर्षीय तरुणी १७ ऑगस्टला शेतात गेली होती. त्यानंतर १९ ऑगस्टला तीचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगताना आढळला होता. दरम्यान, तरुणीचा खून करुन तीचा मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलिसांना चौकशीदरम्यान समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी तरुणीच्या परिचित असलेल्या एका २४ वर्षीय तरुणासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या तिघांनाही पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

जाकिर अहमद ऊर्फ जाकू अहमद निसार (२४, रा. मुगलाईपूरा, परतवाडा), अमोल सुखदेव उईके (२९) आणि मुकेश रामसिंग बेठेकर (१९, दोघेही रा. कोटमी, ता. चिखलदरा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मृत मुलगी ही मागील अनेक वर्षांपासून परतवाड्यात एकटीच राहत होती. ती कापड दुकानात काम करायची. त्यामुळे तिची ओळख परतवाड्यात राहणाऱ्या जाकीरसोबत झाली होती. जाकीर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरम्यान, १७ ऑगस्टला जाकीर तरुणीच्या गावात गेला, त्यावेळी ही तरुणी गावातच होती. त्याने तरुणीला तिच्याच शेतात बोलावले. ‘तू आता माझ्यासोबत का बोलत नाही,’ असे म्हणत त्याने तिच्यासोबत वाद घातला. याच वादा दरम्यान त्याने तरुणीचा गळा दाबून तीचा खून केला.

तत्पूर्वी जाकीरने त्याच्या परिचित असलेल्या अमोल आणि मुकेश यांनाही त्याच शेतात बोलावून घेतले होते. तरुणी मृत झाल्याचे लक्षात येताच त्याच शेतातील विहिरीत तिघांनी मृतदेह टाकला व पसार झाले होते. तरुणी बेपत्ता झाली तरीही पोलिसांत कोणीही मिसिंगची किंवा कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. दरम्यान, १९ ऑगस्टला विहिरीत मृतदेह तरंगताना मृत मुलीच्या माेठ्या वडीलांना दिसला. त्यावेळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला. दरम्यान सदर मुलीचा गळा आवळून खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र या संदर्भात तक्रार आली नव्हती. त्यामुळे आकस्मिक मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असतानाच पोलिसांना या प्रकरणाचा सूत्रधार जाकीर असल्याचे समोर आले. मात्र जाकीरने खून केल्यानंतर गावातून पळ काढला होता. पोलिस त्याच्या मागावर होतेच. यातच रविवारी (दि. ११) रात्री जाकीर चिखलदरा पोलिसांच्या हातात लागला आणि प्रकरणाचे बिंग फुटले. त्यामुळे चिखलदऱ्याचे ठाणेदार राहूल वाढवे यांनी तक्रार नोंदवून तिघांविरुद्ध खून करणे तसेच पुरावा नष्ट करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपासादरम्यान काही आढळल्यास आणखी कलमं वाढवली जाऊ शकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...