आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचा अपघात:पत्नी ठार, तर पतीसह चालक जखमी, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी

वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगणघाट येथील वृद्ध दाम्पत्य पुसद येथे सासरी असलेल्या सुनेला घेण्यासाठी जात असताना वळण मार्गावर वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. या अपघातात वृद्ध महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती व चालक गंभीर झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. सुवर्णा काशेट्टीवार असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सुनेला आणण्यासाठी हिंगणघाट येथील रिठे कॉलनी संत ज्ञानेश्वर नगरचे रहिवासी रमेश कोशेट्टीवार वय ७४ हे पत्नी सुवर्णा रमेश काशेट्टीवार वय ६५ साेबत एमएच ०२ बीजे ६०७८ या क्रमांकाचे कारने जात होते. वडनेर परिसरात येरणगाव गावाजवळ वळण मार्गावर वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या घटनेत कारमध्ये बसून असलेल्या सुवर्णा कोशेट्टीवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती रमेश कोशेट्टीवार आणि वाहन चालक राहुल आडे रा. हिंगणघाट हा सुद्धा गंभीर जखमी झाला.

बातम्या आणखी आहेत...